Vikrant | विक्रांत

Vikrant | विक्रांत

27-10-2022

15:30

#Thread समृद्धी महामार्ग नागपूर-मुंबई ग्रीनफील्ड सुपर कम्युनिकेशन एक्सप्रेसवे म्हणजेच महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा मुंबईच्या Jawaharlal Nehru Port Trust ( JNPT ) ला नागपूरच्या Multimodal International Hub Airport at Nagpur ( MIHAN ) सोबत जोडतो.

701 किमीचा हा Access Controlled Expressway नागपूरच्या शिवमडका गावापासून ठाण्याच्या आमणे गावापर्यंत असून ज्यासाठी एकूण 55,000 कोटी खर्च आला असून, हा देशातल्या सर्वात महाग रोड इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट पैकी एक आहे. नागपूर मधील समृद्धी महामार्गाचे ञप्रारंभिक ठिकाण

हा Expressway नागपूर-वर्धा-अमरावती-वाशिम बुलढाणा-जालना-संभाजीनगर-नाशिक-अहमदनगर-ठाणे असे 10 जिल्हे त्यातील 24 तालुके व 392 गावांना थेट आणि इतर 14 जिल्ह्यांना अप्रत्यक्षरीत्या जोडतो. ज्याने विदर्भ आणि मराठवाडय़ाच्या औद्योगिक विकासाला चालना भेटेल.

हा Expressway सध्या 6 lane असला तरी दोन रस्त्यांच्या मध्ये 50-75 फीट जागा मोकळी सोडलेली आहे जेणेकरून 6 लेनच्या Expressway ला भविष्यात आतील भागात Expand करून 8 लेनचा करता येईल.

समृद्धी महामार्गाला Western Dedicated Freight Corridor आणि दिल्ली मुंबई Industrial Corridor यांसोबतच Under Construction असलेल्या नवीन दिल्ली मुंबई Expressway सोबत जोडले जाणार आहे.

पूर्ण प्रवासात भरपूर नैसर्गिक Scenic Beauty असलेल्या या महामार्गाचे विस्तीर्ण Interchanges पाहण्यासारखे आहेत.

Expressway च्या बांधकामाची जबाबदारी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ ( MSRDC ) कडे असून या हे बांधकाम Engineering, Procurement, Construction ( EPC ) माॅडेल वर झालेय, ज्यात महामार्गाला 16 Packages मधे विभागून 16 Contractors ना याचे काम देण्यात आले आहे.

महामार्गावरील टोल संकल्पना जेवढा वापर तेवढाच टोल अशी असून प्रत्येक एंट्रीला गाडी Scan होणार आणि जिथे Exit घेतली तिथे तेवढ्या अंतराचाच टोल भरावा लागेल. पूर्ण महामार्गावर 26 टोल बूथ असून ज्यात टोल दर LMV कार & जीप साठी 1.73 रूपये/km पासून मोठ्या ट्रक साठी 11.71 रूपये/km पर्यंत आहेत

महाराष्ट्र शासनाने MSRDC लाच New Town Development Authority (NTDA) बनवले असून ज्याच्या अंतर्गत महामार्गाच्या आजूबाजूस 19 कृषी समृद्धी नगर नामक नवीन शहरं स्थापन केले जाणार आहेत. ज्यात MIDC द्वारे कृषी व औद्योगिक वसाहती आणि IT पार्क स्थापन केले जातील.

महामार्गाच्या बांधकामात कापण्यात आलेल्या 10 लाखाहून अधिक वृक्षांचा समतोल राखण्यासाठी 20 लाख विविध पद्धतीच्या वृक्षांची लागवड केली असून ज्यासाठी 900 कोटी रुपये खर्च आला आहे.

जंगलातील भागात प्राण्यांसाठी Overpass बांधण्यात आले आहेत, जैवविविधता असलेल्या भागात Sound Barriers पण बसवण्यात आले असून जेणेकरून प्राण्यांना आवाजाचा त्रास होऊ नये.

पूर्ण मार्गात 6 बोगदे असून, त्यापैकी कसारा घाटात असलेला 7.8 किमीचा अत्याधुनिक Austrian पद्धतीचा बोगदा महाराष्ट्रातील सर्वात लांब आणि देशातील तिसर्‍या क्रमांकाचा बोगदा आहे.

प्रत्येक 50 किलोमीटर वर Food प्लाझा, Refreshment केंद्र, इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन्स असणार आहेत. Emergency साठी प्रत्येक 5 किमी वर मोफत टेलिफोन्स, फर्स्टएड कीट, Ambulances, सुसज्ज Fire Extinguisher वाहनं उपलब्ध आहेत

सुरूवातीला लोकांच्या मोठ्या विरोधाला सामोरे गेलेल्या या समृद्धी महामार्गाने बर्‍याच गावात समृद्धी आणलीय. या महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या अधिकृत युट्यूब चॅनलवर बांधकामाचे अपडेट्स, सोयीसुविधा & समृद्धी लाभार्थ्यांचे व्हिडिओ पाहता येतील.

समृद्धी महामार्गावरील कमाल स्पीड 150 किमी/hr असून जी काही ठिकाणी 120 होते. अश्या भयाण स्पीड मुळे द्रुतगती महामार्गावर दुचाकी आणि तीनचाकी गाड्यांना परवानगी नाही.

2016 मधे DPR file झाल्यापासून 2022 मधे पूर्णत्वाच्या जवळ पोचलेला हा प्रोजेक्ट एकूण 6-7 वर्षात पूर्ण झाला आहे. उत्तर भारतात तयार होत असलेल्या बर्‍याच Expressways च्या भाऊगर्दीत आपला हा मेगा Expressway नक्कीच महाराष्ट्राच्या शिरपेचात एक मानाचा तुरा आहे ❤️‍?


Follow us on Twitter

to be informed of the latest developments and updates!


You can easily use to @tivitikothread bot for create more readable thread!
Donate 💲

You can keep this app free of charge by supporting 😊

for server charges...